आपणास कळविण्यास आनंद होत आहे, कि दिनांक १४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता, महात्मा फुले व्यायाम मंदिर,३९/३७१ मोगल हाउस ना.म.जोशी मार्ग चिंचपोकळी, मुंबई येथे  मी भाविक गुरव संस्थे तर्फे वार्षिक स्नेहसंमेलन , दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि वधू-वर मेळावा आयोजित करण्यात  आला आहे.

संकल्पना नव्या वाटचालीची , नव्या भविष्याची
सस्नेह नमस्कार........
            मित्रहो साक्षात ब्रम्हदेवाने या सृष्टीची निर्मिती केली अन, मानव जात या सृष्टीवर सर्वश्रुत झाली. पौराणिक काळापासून ते अगदी आजच्या कलियुगात सुद्धा त्या मानवजातीचे अनेक धर्म, जाती, पंथ  पडले. भाषा, संस्कृती आणि राहणीमान यावरून आपल्या जाती आणि जमाती ठरल्या. आपापल्या व्यवसायानुसार, राहणीमानानुसार लोक समुदायाने राहायला लागले, वागले , वावरले. त्यापैकीच एक आपली जात......आपला समुदाय ......... अर्थातच आपला गुरव समाज. बारा बलुतेदारांच्या यादीतील हे एक अग्रगण्य नाव. गावाच्या ग्रामदेवतेचा मानाचा पुजारी. अगदी पुरातन काळापासून ते राजा शिवछत्रपतींच्या काळापर्यंत व अगदी आजतगायत गुरव म्हणजे देवाचा पुजारी हे समीकरण अगदी सर्वश्रुत आहे.
            खरं म्हणजे अभिमान आहे, मी देवाच्या सर्वात जवळचा माणूस असण्याचा, कारण ज्या सर्वसाधारण माणसाना देवापर्यंत पोहचण्यासाठी ज्याची मदत लागते, तो म्हणजे 'गुरव'. पण गुरव समाजाच्या आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या अनेक प्रश्नांची यादी मात्र  मोठी आहे.गावाच्या ग्रामदेवतेचे मानाचे पुजारी पण यातला ठसठशीत अभिमान मात्र उत्तरपुजेच्या वेळी देवाच्या अंगावरून काढण्यात येणाऱ्या सुकलेल्या फुलांसारखा झालाय. कुठे हरवलाय आपला स्वाभिमान....? काय आहे आपली ओळख....? असे अनेक प्रश्न आपणासमोर उभे राहतात, आणि गरज भासते ती आत्मचिंतनाची, आपली खरी ओळख शोधण्याची, अर्थातच लढाई अस्तित्वाची. साल २०११ गुरव ज्ञाती समाजाची कार्यकारणी मंडळासाठी निवडणूक, जी तब्बल १० वर्षांनी झाली जशी राजकीय पक्षांची लढत. या निवडणुकीत गुरव समाजाशी निगडीत अनेक व्यक्तींचा संपर्क आला. समाजाची इतकी बिकट व वाईट परिस्थिती बघताना व ऐकताना मन व्यथित झालं. आजवरचे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप असणारी मंडळी आणि त्याचबरोबर सर्व समाज बदनाम झालाय...कारण समाजहिताचे देणघेण नसणारी सगळी बजबजपुरी पहिली आणि स्वतंत्र व्यासपीठाच्या विचारांची पहिली ठिणगी पडली. या गुरव समाजाला नवा चेहरा, नवी ओळख, नवी अस्मिता देण्यासाठी हि मंडळी अर्थातच श्री. रामचंद्र राघोबा गुरव, श्री.विलास शांताराम गुरव, श्री.प्रकाश विठ्ठल गुरव व श्री. शशिकांत काशीराम गुरव एकत्र आले. आणि एकमुखाने ठरले की आपल्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ हवं आणि ते म्हणजे "मी भाविक गुरव". या मंडळींच्या संकल्पनेतून मूर्त रूप साकारलं ते म्हणजे मी भाविक गुरव.
             समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा असे मानून गेली अनेक वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत समाजाशी बांधील राहून समाजकार्य करणारे आणि कायम समाजाशी आपली नाळ जोडून ठेवा, संघटीत सहकाराच महत्व जाणणारे श्री.रामचंद्र राघोबा गुरव यांच्या विचारांनी, त्यांच्यातल्या आत्मीयतेने आणि श्री.विलास शा. गुरव, श्री प्रकाश वि. गुरव आणि श्री.शशिकांत का. गुरव यांच्या यांच्या संकल्पनेतून "मी भाविक गुरव" हे रोपटे लावलं गेलंय. म्हणून मी भाविक गुरव संघटनेचे जनक, आदयकार श्री.रामचंद्र राघोबा गुरव यांचा आम्हाला अभिमान व गर्व वाटतो.
            या मंडळीनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी आता अनेक मंडळी, तरुण/तरुणी या संप्रदायात येणं आवश्यक आहे तरच हा समाज संघटीत होईल, सक्षम बनेल व इतर समाजाबरोबर आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनेल अशी आम्ही नक्की अशा बाळगतो.
              धन्यवाद....!
कार्यकारणी 
Powered by Manoj Gurav®
Copyright 2012 mibhavikgurav.com, Mumbai. All rights reserved.